February 14, 2015

ज्वारीचे धिरडे by उषाबाई रा. चौधरी (माझी आजी)

आजीची ज्वारीचे धिरडे रेसिपी:
प्रथम साहित्य:
ज्वारी रात्री भिजवून ठेवावी । ती वाळल्यावर तिचे पीठ दळून घ्यावे .
१ कप मेथिच्या पिठाला- २० कप (20) ज्वारीचे(नवी) पिठ. या प्रमाणात पीठ घ्यावे .
(रात्रभर भिजवून वाळवलेली ज्वारी)
कृती :
प्रथम १ कप मेथीचे पिठ व ४ कप ज्वारीचे पिठ एकत्र करुन पातळसर परंतु गाठी न करता घाटा करावा.
हा घाटा थंड झाल्यावर त्यात उरलेले ज्वारिचे पीठ एकत्र मिसळून रात्रभर ठॆवावे. रात्रितुन हे मिश्रण
फसफसुन येते.
सकाळी धिरडे करताना गरजेपुरते मिश्रण काढून त्यात गरजेपुरते (थोडेसे) मिठ कालवून
ते मिश्रण एकजीव करावे.
तवा तापवून तव्याला पुरेसे तेल लावावे.
नंतर १ कपभर मिश्रण तव्यावर समपातळीत पसरावे. (हाताने)
मिश्रण पसरल्यानंतर चहुबाजूंनी थोडॆ तेल टाकल्यास धिरडॆ लवकर वाकवले जाते.
त्यानंतर तव्यावर झाकण ठॆवावे. साधारण २ मिनीटांनी झाकण काढून
सरट्याने चहुबाजुंनी धिरडे झाल्याचे जाणवले म्हणजे उलटवावे.
तव्यावर असतांनाच अर्ध्या बाजुवर बारिक चिरलेला गुळ व त्यावर थोडे तेल टाकुन धिरड्याची घडी घालावी.
व खाली उतरवावे , आणि गरमा गरम वाढावे …
- By .. स्व. उषाबाई रा. चौधरी (माझी आजी)

For translate use: Google Translate

-- मनोज बोंडे
Date: 14-02-2015

No comments:

Post a Comment